संख्यात्मकदृष्ट्या भरपूर सृजन निर्मिती होत असली तरी, सगळाच कलाव्यवहार एका सकस केंद्राकडून ‘मीडिऑक्रिटी’च्या परिघावर स्थिरावत असल्यासारखा दिसतोय...
Computer creativityच्या पुढे ‘कलाकार’ ही जमातच नष्ट होईल का? २०२९पर्यंत, मानवाएवढी बुद्धिमत्ता कम्प्युटर्सकडे असेल, तर कोणाची कला श्रेष्ठ ठरेल - मानवी सृजनाची का संगणकाची? ‘संगणकाने चालवलेला मानवी मेंदू’, हेच जर भविष्यातलं वास्तव असेल तर त्या तंत्रज्ञानाचा ताबा कोणाकडे असणार? आताच जर आपण इतक्या प्रमाणात सायबॉट्समध्ये रूपांतरित झालेलो आहोत, तर आपल्या स्वातंत्र्याचे काय? .......